सूक्ष्म सिंचन आणि वैयक्तिक शेततळे करिता 160 कोटीचा निधी मंजूर, पहा किती अनुदान मिळेल, Drip Irrigation Subsidy

Drip Irrigation Subsidy नमस्कार शेतकरी मित्रांनो शासनाने पुन्हा एक नवीन जीआर जाहीर केला आहे त्यामध्ये आपल्याला सूक्ष्मसिंचन आणि वैयक्तिक शेततळीकरिता 160 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. शेतकरी मित्रांनो या योजनेअंतर्गत तुम्हाला म्हणजे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना 80 टक्के पर्यंत अनुदान देण्याचे आव्हान शासनाने दिले आहे. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना अंतर्गत ठिबक सिंचन, तुषार सिंचन आणि वैयक्तिक शेततळी करता हा नवीन जीआर सादर करण्यात आलेला आहे तर चला याबद्दल सर्व माहिती जाणून घेऊया.

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना

शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना ही 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना अंतर्गत ठिबक सिंचन, तुषार सिंचनाच्या पूरक अनुदानाबरोबर वैयक्तिक शेततळे, शेततळ्याचे अस्तरीकरण, हरितगृह उभारणी व शेडनेट हाऊस उभारणे या गोष्टींसाठी अनुदान विस्तारित केले जातात. त्यामुळे तुम्ही देखील शेती करत असाल आणि तुमच्याकडे पाण्याची उपलब्धता मर्यादेपेक्षा कमी असेल तर तुम्ही मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेचा लाभ घेऊ शकता, यासाठी तुम्हाला अर्ज करणे खूप महत्त्वाचे आहे तर चला पुढची प्रोसेस जाणून घेऊया.

पीएम सूर्य घर योजनेला मंजुरी, मिळणार 78,000 रुपयांचा अनुदान, पहा कसे? PM Suryaghar scheme 2024

उर्वरित 75% पिक विमा कधी मिळणार? 75% पिक विमा वाटप मोठी अपडेट, Crop Insurance 2023

ठिबक सिंचन व वैयक्तिक शेततळे करिता अनुदान किती आहेत?

ठिबक सिंचन व वैयक्तिक शेततळे करिता अनुदान किती आहेत?
ठिबक सिंचन व वैयक्तिक शेततळे करिता अनुदान किती आहेत?

शेतकरी मित्रांनो शासन 2023-2024 या वर्षी निर्णयामध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना अंतर्गत ठिबक सिंचन, तुषार सिंचन आणि वैयक्तिक शेततळे या घटकांकरिता जवळपास 160 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात येत असून सूक्ष्म सिंचन यामध्ये ठिबक सिंचन, तुषार सिंचन इत्यादी घटक आहेत ज्यांना 140 कोटीचा निधी राष्ट्रीय कृषी विकास योजना घटकांतर्गत देण्यात येत आहे आणि वैयक्तिक शेततळे करिता जवळपास 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे. अशी एकूण मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत 160 कोटींचा निधी मंजूर केलेला आहे.

ठिबक व तुषार सिंचनाला मिळणार 80% अनुदान, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, Drip Irrigation 80% Subsidy

जर या योजनेअंतर्गत लाभार्थ्याची निवड झाली तर त्यांना अनुदान मंजुरीची कार्यवाही महाडीबीटी प्रणाली द्वारे करण्यात येईल आणि लाभार्थ्यांच्या आधार लिंक असणाऱ्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करण्यात येईल.

शासन निर्णय(GR) पाहण्यासाठी येथे क्लिक करा