Today cotton Rate: नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचा अजून एक नवीन लेखांमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण पुन्हा आजच्या कापसाचे बाजार भाव पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो कापसाचा भाव सध्या वाढत चाललेला आहे. महाराष्ट्रातील सर्व बाजार समितीमध्ये सध्या एकच ट्रेंड आला आहे तो म्हणजे चांगल्या क्वालिटीचा कापूस विकत घेणे. सध्या महाराष्ट्रातील सर्व व्यापाऱ्यांमध्ये चांगल्या प्रकारचा कापूस विकत घेण्याची शर्यत लागली आहे. ते तर तुम्हाला माहित असेलच. कारण की आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा कापसाचे दर वाढले आहेत. भारतामध्ये कापसाची टंचाई वाढत चाललेली आहे. सध्या 75 टक्के शेतकऱ्यांनी कापूस विकलेला आहे आता फक्त 25 टक्के कापूस हा शेतकऱ्यांकडे आणि व्यापाऱ्यांकडे राहिलेला आहे त्यामुळे कापसाचे दर 100 टक्के वाढण्याचे चान्सेस आहेत. कापसाला 9,000 हजार पर्यंत दर होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. तर चला पाहूया आज संपूर्ण महाराष्ट्र मध्ये जिल्ह्यानुसार कापसाला किती दर भेटला आहे.
आजचे कापसाचे बाजार भाव दि.03/03/2024
सध्या महाराष्ट्र मध्ये मानवत, देऊळगाव राजा आणि बोरगावमंजू येथे कापसाला तगडा दर मिळत आहे. मानवत येथे जवळपास 8000 हजार प्रति क्विंटल कापसाला दर मिळत आहे. त्याचबरोबर देऊळगाव राजा येथे कापसाला 8000 हजार जवळ भाव आहेत. मागील काही दिवसांमध्ये देऊळगाव राजा येथे कापसाला 8100 रुपये प्रति क्विंटल दर मिळत होता आणि याचमुळे शेतकऱ्यांनी आपला कापूस त्याचवेळी विकायला काढला होता. तर चला पाहूया जिल्हा नुसार कोणत्या बाजार समितीमध्ये सर्वात चांगला कापसाला दर मिळाला आहे.
बाजार समिती | जास्तीत जास्त दर |
अमरावती | 7200 रु. |
भद्रावती | 7200 रु. |
अकोला | 7850 रु. |
अकोला (बोरगावमंजू) | 8000 रु. |
उमरेड | 7300 रु. |
वारोरा-माधेली | 7350 रु. |
मानवत | 7890 रु. |
देऊळगाव राजा | 7950 रु. |
सिंधी(सेलू) | 7600 रु. |
फुलंब्री | 7200 रु. |
Today cotton Rate
शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहीत असेल की संपूर्ण महाराष्ट्र मध्ये शेतकऱ्यांच्या तोंडामध्ये दोन ते तीनच बाजार समितीचे नाव येत आहे. ते म्हणजे देऊळगाव राजा बाजार समिती दुसरी परभणी येथील मानवत बाजार समिती आणि तिसरी म्हणजे अकोला बोरगाव मंजू बाजार समिती. शेतकरी मित्रांनो या तीन बाजार समितीमध्ये कापसाचे दर हे एकदम वाढत आहेत आणि येथील व्यापारी लोकांमध्ये कापूस विकत घेण्यासाठी चढावर लागलेली आहे. मित्रांनो कारण फक्त एकच आहे की आता शेतकऱ्यांकडे सर्व कापूस विकलेला आहे. फक्त 25 टक्के कापूस हा शिल्लक राहिलेला आहे. आणि एप्रिल मे महिन्यापर्यंत कापसाचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
मागील काही दिवसांमध्ये म्हणजे फेब्रुवारी च्या दुसऱ्या हप्त्यापासून कापसामध्ये आपल्याला 10 टक्के दर वाढ पाहायला मिळाली आणि आता काही कापूस अभ्यासक सांगत आहेत की अजून एप्रिल ते मे महिन्यापर्यंत यामध्ये 5 टक्के दर वाढ होईल. त्याचे कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर कापसाचे दर वाढले आहेत आणि चीन, बांगलादेश आणि व्हिएतनाम सारख्या देशांमध्ये कापसाची मागणी वाढलेली आहे. त्याचबरोबर भारतामध्ये सुद्धा उद्योगांसाठी कापसाची टंचाई भासत आहे.
आजचे तुरचे बाजार भाव, दि.02/02/2024, जिल्ह्यानुसार यादी पहा संपूर्ण महाराष्ट्र, Tur price today
पीएम सूर्य घर योजनेला मंजुरी, मिळणार 78,000 रुपयांचा अनुदान, पहा कसे? PM Suryaghar scheme 2024