Cotton Rate Prediction शेतकरी मित्रांनो मार्च महिना सुरू झालेला आहे आणि कापसाची मागणी सुद्धा वाढलेली आहे. सध्या बाजार समितीमध्ये व्यापारी लोक कापूस विकत घेण्यासाठी खूप मरमर करीत आहे. कारण की कापसाचे भाव येत्या काही दिवसांमध्ये वाढणार आहे. याची बरेच काही कारण आहे जसे की चीन, बांगलादेश, व्हिएतनाम या देशांमध्ये कापसांची मागणी ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा कापसाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यामुळे भारत देशामध्ये कापसाची मागणी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. महाराष्ट्र मध्ये कापसाचे भाव गेल्या दोन आठवड्यापासून वाढत आहेत. सध्या कापसाला सरासरी प्रति क्विंटल दर 7200 ते 7500 पर्यंत भेटत आहे आणि तुम्हाला जर माहीत असेल की महाराष्ट्र राज्यातील 3 अशा बाजार समित्या अशा आहेत ज्यांनी 8000 हजार रुपयांच्या टप्पा पार केलेला आहे. त्याबद्दल आपण समोर बोलणार आहोत.
आजचे कापसाचे भाव जिल्ह्यानुसार यादी पहा संपूर्ण महाराष्ट्र
कापसाचे भाव वाढणार का?
कापसाचे भाव येत्या काही दिवसांमध्ये शंभर टक्के वाढणार असे कापूस अभ्यासकांनी सांगितलेल आहे. कारण की सध्या 75% कापूस शेतकऱ्यांनी विकलेला आहे. शेतकऱ्यांना वाटलं मागच्या वर्षी प्रमाणे याही वर्षी जर कापसाला भाव नाही राहिला तर पुन्हा हा कापूस घरामध्ये पचून राहील. परंतु झालं उलट राज्यातील जवळपास 75% शेतकऱ्यांनी कापूस विकला आहे. आता फक्त 25% कापूस राज्यामध्ये शिल्लक राहिला आहे तो म्हणजे शेतकऱ्यांकडे आणि व्यापारांकडे साठवला गेला आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर कापसाचे भाव वाढल्यामुळे भारतामध्ये सुद्धा कापसाचे भाव 10% वाढले आहेत. सध्या मार्चमध्ये कापसाचे दर हे 8000 रुपयाच्या पलीकडे जाण्याचा अंदाज काही कापूस अभ्यासकांनी दिला आहे आणि येत्या एप्रिल-मे महिन्यामध्ये पुन्हा 5% पर्यंत या कापसाच्या भावामध्ये वाढ होईल असे सांगितले गेले आहे. मित्रांनो सध्या काही बाजार समितीमध्ये कापसाला 8100 प्रतिक्विंटल एवढा दर मिळत आहे म्हणजे जवळपास एप्रिल-मे पर्यंत कापसाचे दर हे 9000 हजार रुपये जास्तीत जास्त होतील.
पीएम सूर्य घर योजनेला मंजुरी, मिळणार 78,000 रुपयांचा अनुदान, पहा कसे? PM Suryaghar scheme 2024
उर्वरित 75% पिक विमा कधी मिळणार? 75% पिक विमा वाटप मोठी अपडेट, Crop Insurance 2023
Cotton Rate वाढणार याची कारणे
75% शेतकऱ्यांनी कापूस विकला आहे. आता फक्त 25% कापसाचा स्टॉक राज्यामध्ये शिल्लक आहे. त्याबरोबरच अमेरिकेची सुद्धा हेच हाल आहे. अमेरिकेतील शेतकऱ्यांनी 80% कापूस विकला असून आता फक्त अमेरिकेकडे 20% कापसाचा स्टॉक शिल्लक आहे. याबरोबर शेतकऱ्यांची विक्री कमी झाली आहे आणि यामुळे सुद्धा भाव वाढ होईल . आपल्या देशातील कापड, सूत आणि कापूस निर्यात वाढली गेली आहे. सूतगिरणी आणि कापड उद्योगाकडे कापसाचा स्टॉक कमी झाला आहे. व्हिएतनाम, बांगलादेश आणि चीन अशा देशांमध्ये कापसाची मागणी वाढली आहे. हे कारण आहेत ज्यामुळे कापसाचे दर वाढू शकतात.