Namo Shetkari Yojana 2nd installment not received नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन माहितीमध्ये. शेतकरी मित्रांनो काल म्हणजे 28 फेब्रुवारी 2024 रोजी जवळपास 88 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातून वाटप करण्यात आला होता. शेतकऱ्यांनो 28 फेब्रुवारी 2024 रोजी शेतकऱ्यांचे बँक खात्यामध्ये जवळपास 6000 हजार रुपये जमा करण्यात आलेली आहे. त्यामध्ये सर्वप्रथम म्हणजे पीएम किसान योजनेचा 16वा हप्त्याची 2 हजार रुपये आणि नमो किसान योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता एकाच दिवशी जमा करण्यात आलेली आहेत, असे मिळून शेतकऱ्यांना 6 हजार रुपये वाटप करण्यात आलेले आहेत. परंतु अद्याप बऱ्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता मिळालेला नाही. अशा शेतकऱ्यांनी काय करावे तर चला जाणून घेऊया सर्व काही.
नमो शेतकरी दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्यासाठी जवळपास 90 लाख शेतकरी पात्र आहेत आणि दुसरा हप्त्यासाठी जवळपास 1792 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. नमो शेतकरी योजनेची तिसरा हप्त्यासाठी दोन हजार कोटींचा निधी मंजूर केलेला आहे. शेतकऱ्याची बँक खात्यामध्ये 28 फेब्रुवारी 2023 रोजी नमो शेतकरी योजना अंतर्गत दुसरा आणि तिसरा हप्ता जमा करण्यात आलेला आहे. लाभार्थ्यांना दुसरा आणि तिसरा हप्ता मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांनी थोडी वाट पाहावी.
नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता मिळाला नाही
नमो शेतकरी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता त्यात शेतकऱ्यांना मिळणार आहे जे शेतकरी पहिल्या हप्त्यामध्ये पात्र होते. ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्त्याचे 2 हजार रुपये मिळाले होते. त्या शेतकऱ्यांना 28 फेब्रुवारी 2024 रोजी 4 हजार रुपये मिळाले आहेत. परंतु ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता मिळूनही दुसरा आणि तिसरा हप्ता मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांनी दोन दिवस वाट पाहावी. कारण डीबीटी द्वारे पैसे ट्रान्सफर व्हायला वेळ लागतो.
आजचे कापसाचे बाजार भाव, दि.29/02/2024, जिल्ह्यानुसार यादी पहा संपूर्ण महाराष्ट्र, Today cotton Rate
ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता हा दिवाळीमध्ये मिळाला नव्हता आणि आणि अशा शेतकऱ्यांनी सर्व काही प्रोसेस करून घेतलेली आहे जसे की सीएससी केंद्रामध्ये जाऊन आधार लिंक, बँक खाते लिंक बायोमेट्रिक अशा सर्व गोष्टी ज्या शेतकऱ्यांनी केले आहेत त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजना कडून सध्या फक्त 2 हजार रुपये मिळणार आहेत. नंतर पुढच्या हप्त्यामध्ये तुम्हाला या दोन्हीही हप्त्याचे पैसे मिळून जातील त्यामुळे चिंता करण्याची काही गरज नाहीये.
जर नमो शेतकरी योजना अंतर्गत लाभार्थ्यांना आतापर्यंत एकही रुपया भेटला नसेल अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर सीएससी केंद्रामध्ये जाऊन आपली केवायसी करणे खूप गरजेचे आहे. सोबतच आधार लिंक, बँक खाते लिंक या सर्व गोष्टी करणे खूप गरजेचे आहे. तुम्ही आतापर्यंत या गोष्टी केल्या नसाल तर तुम्हाला या योजनेचा एकही रुपया भेटणार नाही. परंतु तुम्ही जर केवायसी केली तर तुम्हाला मागच्या हप्त्याची पैसे सुद्धा पुढच्या हप्त्यामध्ये सर्व काही रक्कम मिळून जाईल. म्हणून शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ही केवायसी करणे गरजेचे आहे.
2 thoughts on “नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता मिळाला नाही, पहा कशामुळे?, Namo Shetkari Yojana 2nd installment not received”