Today cotton Rate नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन लेखांमध्ये. मित्रांनो कापसाचे दर हे वाढलेले आहेत. जर शेतकऱ्यांना पैशाची खूपच गरज असेल अशा शेतकऱ्यांनी कापूस लवकरात लवकर विकण्यास काढावा आणि जर शेतकऱ्यांना अजून कापसाचे दर वाढण्याची इच्छा असेल तर त्या शेतकऱ्यांनी थोडा इंतजार करावा. शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या कापसाला 8000 हजार पेक्षा जास्त भाव भेटत आहे. ते कोणत्या बाजार समितीमध्ये भेटत आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत. या वेळेची शेतकऱ्यांनी बऱ्याच दिवसापासून वाट पाहिली आहे त्यामुळे सध्या शेतकऱ्यांनी श्वासात श्वास घेतलेला आहे. मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की जिल्ह्यानुसार कापसाला किती दर भेटला आहे आणि भविष्यामध्ये म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये कापसाला भाव वाढू शकतो का याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत.
Today cotton Rate ?
शेतकरी मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे परभणी जिल्ह्यातील मानवत बाजार समिती येथे कापसाला प्रतिक्विंटल जास्तीत जास्त दर हा 8000 हजार रुपये मिळत आहे आणि अकोला जिल्ह्यातील राजा देऊळगाव बाजार समिती येथे कापसाला प्रतिक्विंटल जास्तीत जास्त दर हा 8100 रुपये दर मिळत आहे. यानंतरही बऱ्याच बाजार समिती असे आहेत जेथ सुद्धा चांगला बाजार भाव मिळत आहे. त्यांचे बाजारभाव आम्ही खाली टेबल मध्ये मेन्शन केले आहे, ते तुम्ही वाचून घ्यावे.
बाजार समिती | जास्तीत जास्त दर |
मानवत | 8000 रु. |
देऊळगाव राजा | 8100 रु. |
पारशिवनी | 7150 रु. |
उमरखेड | 7310 रु. |
वारोरा-माडेली | 7500 रु. |
नेर परसोपत | 6500 रु. |
काटोल | 7250 रु. |
अमरावती | 7100 रु (27/02/2024) |
मागेल त्याला सौर कृषी पंप योजना, राज्यात 8 लाख 50 हजार सौर कृषी पंप मिळणार? Maharashtra Budget 2024
आजचे कापसाचे बाजार भाव?
शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की कापसाचे दर म्हंटले की परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्याचे आणि अकोला जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्याचे नाव येते. शेतकरी मित्रांनो या दोन तालुक्यांमध्ये एवढा जबरदस्त कापसाला भाव भेटला आहे की शेतकरी सध्या ढगात पोहोचले आहेत. शेतकरी मित्रांनो कापसाने 8000 हजार रुपयांचा आकडा पार केलेला आहे आणि व्यापारी लोकांमध्ये सध्या कापूस विकत घेण्यासाठी शर्यत लागलेली आहे. कारण की केंद्र शासनाने दिलेल्या भावापेक्षाही व्यापारी लोक जास्त दराने कापूस विकत घेत आहेत. त्यामुळे असा संशय निर्माण होत आहे की पुढच्या महिन्यामध्ये कापसाचे दर 9000 पर्यंत जाऊ शकतात. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर कापूस विकावा. परंतु ज्या शेतकऱ्यांना पैशाची गरज नाही अशा शेतकऱ्यांनी कापूस जपून ठेवावा.
2 thoughts on “आजचे कापसाचे बाजार भाव, दि.29/02/2024, जिल्ह्यानुसार यादी पहा संपूर्ण महाराष्ट्र, Today cotton Rate”