Lek Ladki Yojana 2024 सध्या सुरू असलेल्या महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी लेक लाडकी योजनेसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे, या योजनेचा त्याच मुलींना लाभ मिळेल ज्यांच्या कुटुंबाकडे पिवळे आणि केसरी रेशनकार्ड असेल. या योजनेअंतर्गत मुलींना 1 लाख 1 हजार रुपये मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. मुलीच्या जन्मापासून ते मुलगी 18 वर्षे होईपर्यंत या योजनेचे अनुदान मुलीला मिळत राहील. यासाठी कोणत्या कोणत्या बाबी महत्त्वाचे आहेत त्या सर्व आपण जाणून घेणार आहोत. लेक लाडकी योजना ही 1 एप्रिल 2023 रोजी सुरू करण्यात आली होती. त्याआधी माझी कन्या भाग्यश्री योजना मुलींसाठी राबवण्यात येत होती. परंतु या योजनेअंतर्गत चांगला रिस्पॉन्स न भेटल्यामुळे लेक लाडकी योजना ही सुरू करण्यात आली. तर चला यासाठी मुलींना किती अनुदान मिळते? पात्रता काय असते? आणि अर्ज कसा करावा याबाबत सर्व काही जाणून घेऊया.
लेक लाडकी योजना 2024
मित्रांनो लेक लाडकी योजना 01 एप्रिल 2023 रोजी पुन्हा नव्याने सुरू करण्यात आली होती. ही योजना फक्त मुलींच्या सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचे मुख्य उद्दिष्टे म्हणजे मुलींचा मृत्यू दर कमी करणे, बालविवाह कमी करणे, मुलींना शिक्षणात चालना देणे, मुलींचा जन्मदर वाढवणे. हे काही मुख्य उद्दिष्टे या योजनेअंतर्गत आहेत. ज्या मुली एक एप्रिल 2023 नंतर जन्मले आहेत अशा मुलींना लेख लाडकी योजना चा लाभ भेटणार आहे. या योजनेअंतर्गत मुलींना टप्प्याटप्प्याने अनुदान मिळेल याची सर्व चर्चा आपण पुढे केली आहे .
लेक लाडकी योजना अनुदान कसे मिळते?
मित्रांनो ज्या मुली 1 एप्रिल 2023 नंतर जन्मले आहेत. अशा मुलींना ‘लेक लाडकी योजनेचे’ अनुदान मिळू शकते. यासाठी मुलींच्या पालकांकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे खूप महत्त्वाचे आहे. मित्रांनो ज्या मुली 1 एप्रिल 2023 च्या अगोदर जन्मलेले आहेत त्यांना ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजना अंतर्गत अनुदान मिळेल. लेक लाडकी योजनेअंतर्गत जन्मलेल्या मुलीला 5000 हजार रुपये मिळतील. त्यानंतर जेव्हा मुलगी इयत्ता पहिली मध्ये जाईल तेव्हा त्या मुलीला 6000 हजार रुपये मिळतील. त्यानंतर जेव्हा मुलगी सहावी मध्ये जाईल तेव्हा त्या मुलीला 7000 हजार रुपये मिळतील आणि जेव्हा मुलगी अकरावी मध्ये जाईल तेव्हा त्या मुलीला 8000 हजार रुपये मिळतील आणि शेवटची अनुदान म्हणजे जेव्हा मुलगी 18 वर्षाची होईल तेव्हा त्या मुलीला 75 हजार रुपये मिळतील याप्रमाणे एकूण रक्कम 1 लाख 1 हजार रुपये मुलींना लेक लाडकी योजनेद्वारे देण्यात येईल.
लेक लाडकी योजनेसाठी लागणारी कागदपत्रे?
लेक लाडकी योजनेसाठी कोणते कोणते कागदपत्रे लागतील ते सर्व आपण या लेखांमध्ये डिस्कस केलेले आहे. या योजनेचा लाभ भेटण्यासाठी लाभार्थीच्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी राशन कार्ड असणे खूप गरजेचे आहे. त्यानंतर लाभार्थींचा जन्म दाखला, उत्पन्नाचा दाखला, लाभार्थीच्या आधार कार्ड, पालकांचे आधार कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स, मतदान कार्ड, लाभार्थीच्या शाळेतील दाखला, कुटुंब नियोजन प्रमाणपत्र आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा मुलगी 18 वर्षाची होते तेव्हा तिला अंतिम लाभ मिळणार असतो तेव्हा त्या मुलीचे लग्न झालेले नाही पाहिजे, त्यासाठी लाभार्थीचे अविवाहित असल्याचे स्वयंघोष प्रमाणपत्र इत्यादी डॉक्युमेंट्स या योजनेसाठी लागतात.
लेक लाडकी योजनेचा अर्ज कोठे करावा?
लेक लाडकी योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे अर्ज करता येतो. ऑफलाईन अर्ज करायचा असल्यास तुम्हाला लाभार्थीच्या जन्म दाखला घेऊन अंगणवाडी सेविकाकडे जाणे खूप महत्त्वाचे आहे. त्यानंतर सर्व अर्ज भरून आणि डॉक्युमेंट जमा करून अंगणवाडी सेविका कडे देणे महत्त्वाचे आहे त्यानंतर अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी पर्यवेक्षिका तुमचा अर्ज भरून टाकेल. ऑनलाइन अर्ज करिता तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर जाणी महत्वाची आहे.