PM किसान योजनेचा १६ वा हप्ता, 2000रु. या तारखेला मिळणार, हेच शेतकरी पात्र आहेत? 16th installment of PM Kisan Yojana

16th installment of PM Kisan Yojana: शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र शासनाने 2019 वर्षी PM किसान योजना ही सुरू केली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6000 हजार रुपये दिले जातात. ते म्हणजे 2000 हजार रुपयांचे 3 हप्ते एका वर्षात दिले जातात. या योजनेमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक पाठबळ मजबूत होते आणि सरकारवर विश्वास वाढतो. या योजनेचे उद्दिष्ट एकच आहे की शेतकऱ्यांनी शेती करणे सोडून देऊ नये आणि केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने दिलेल्या प्रत्येक योजनेचा लाभ घ्यावा. सध्या सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न उभारत आहे तो म्हणजे PM किसान योजनेचा 16वा हप्ता कधी भेटणार आहे. तर मित्रांनो PM किसान योजनेचा 16 हप्ता कधी भेटणार आहे याबद्दल चर्चा करणार आहोत

PM किसान योजनेचा १६ वा हप्ता कधी मिळणार?

PM किसान योजनेचा १६ वा हप्ता कधी मिळणार?
PM किसान योजनेचा १६ वा हप्ता कधी मिळणार?

शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजना 16 वा हप्ता कधी मिळणार हे सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे. तर भारतामधील करोडो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 28 फेब्रुवारी 2024 या रोजी पीएम किसान योजनेचा सोहळा हप्ता जमा होणार आहे. ही माहिती केंद्र शासनाने त्यांच्या नवीन जीआर द्वारे दिली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यवतमाळ येथील एका मोठ्या कार्यक्रमांमध्ये येणार आहेत. त्यानंतर त्या दिवशी म्हणजे 28 फेब्रुवारी 2024 रोजी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता, नमो शेतकरी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता एकाच दिवशी जमा करण्यात येणार आहे.

कोणती शेतकरी पात्र असतील?

PM किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी खाली काही पात्रता आणि निकष दिले आहे ते तुम्ही सर्व वाचून घ्यावे:

  • PM किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याची वय 18 वर्षे पासून 70 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थ्यांच्या नावावर जमीन असणे खूपच गरजेचे आहे कुटुंबातील पती-पत्नी वडील माता पिता यांच्या नावावर जमीन असणे खूप गरजेचे आहे तरच त्यांना नमो किसान योजनेचा लाभ मिळेल.
  • ही योजना फक्त शेतकऱ्यांनाच आहे. ज्या शेतकऱ्यांना सरकारी नोकरी वगैरे काही आहे असेल तर त्यांना या योजनेचा फायदा मिळणार नाही.
  • लाभार्थी हे भारतातीलच नागरिक असावे

अर्ज कसा करावा?

शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी दोन प्रकारे अर्ज केल्या जातात एक म्हणजे ऑनलाईन दुसरा म्हणजे ऑफलाईन ऑनलाईन मध्ये तुम्ही सरकारच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जाऊन अर्ज करू शकता आणि ऑफलाईन म्हणजे जवळच्या CSC केंद्र, किंवा कृषी विभागाचे कार्यालय, किंवा तलाठी कार्यालयात जाऊन तुम्ही अर्ज फॉर्म भरू शकता.

ई-केवायसी करणे आवश्यक

PM किसान योजनेचा सोळावा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यासाठी तुम्हाला ही ई-केवायसी करणे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही ई-केवायसी केली नाही तर तुम्हाला या योजनेचा फायदा मिळणार नाही, ई-केवायसी करण्यासाठी तुम्ही जवळच्या ई-केवायसी केंद्रात जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने ई-केवायसी करून घ्यावी.

1 thought on “PM किसान योजनेचा १६ वा हप्ता, 2000रु. या तारखेला मिळणार, हेच शेतकरी पात्र आहेत? 16th installment of PM Kisan Yojana”

Leave a comment