Punjab Dakh Weather Forecast नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पाऊस आणि गारपीट होणार असे हवामान खात्याने नोंदवल आहे. ही गारपिट पुढील तीन दिवस म्हणजे 27, 28 आणि 29 फेब्रुवारी पर्यंत होणार आहे. राज्यामधील मराठवाडा आणि विदर्भ या भागातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि गारपीट होणार असल्याची माहिती हवामान अभ्यासात पंजाब डक यांनी सुद्धा नोंदवली दिली आहे. तर शेतकरी मित्रांनो हा गारपीटीचा इशारा पिकांसाठी खूपच घातक ठरणार आहे. हवामान खात्याने जवळजवळ 13 जिल्ह्यांमध्ये येल्लो अलर्ट दर्शवला आहे. त्यामुळे या 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सावध व्हावे आणि आपल्या पिकांचे संरक्षण करावे. तर मित्रांनो विदर्भ आणि मराठवाड्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये गारपीट होणार आणि पाऊस होणार याची संपूर्ण माहिती आम्ही पुढे दिलेली आहे. ती तुम्ही सविस्तर वाचून घेणे.
महाराष्ट्रात या जिल्ह्यात गारपीट होणार-Maharashtra Rain Update
शेतकरी मित्रांनो स्वतः आयएमडी(IMD) हवामान खात्याने महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये गारपिट होण्याचा अंदाज लावलेला आहे. ज्याच्यामुळे आपल्या इथे थंडीच्या मुक्काम जो आहे तो अजून काही दिवस वाढू शकतो. शेतकरी मित्रांनो 25, 26 आणि 27 फेब्रुवारी या काळामध्ये वादळी पावसाचा गारपिटीचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. हा पाऊस आणि गारपीट फक्त विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये होणार आहे. आयएमडी खात्याने 13 जिल्ह्या चे नाव सांगितले आहेत जेथे गारपीट होण्याची शक्यता आहे. ते पुढील प्रमाणे आहेत ते म्हणजे परभणी हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, नाशिक आणि यवतमाळ या 13 जिल्ह्यांमध्ये आयएमडी खात्याने येल्लो अलर्ट दर्शवला आहे.
- लेक लाडकी योजना 2024, जन्मलेल्या मुलीस मिळणार 1 लाख रुपये, पहा अर्ज, कागदपत्र, पात्रता काय आहे? Lek Ladki Yojana
- नमो शेतकरी योजना दुसरा हप्ता, नमो शेतकरी योजना 2रा हप्ता कधी मिळणार तारीख पहा, एकूण 6000 मिळणार, Namo Shetkari Yojana 2nd Installment
पंजाब डख हवामान अंदाज
शेतकऱ्यांनो मान्सून संपून आता बराच काळ झालेला आहे. तरीसुद्धा दर महिन्यामध्ये आपल्याला गारपीट आणि पाऊस हा जाणवतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा होत आहे. मागे झालेल्या अतिवृष्टीमुळे परभणी, नाशिक अमरावती, हिंगोली, नगर, संभाजीनगर आणि जालना अशा बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि आता पुन्हा हवामान खात्याने राज्यावरती गारपिटीचा अंदाज नोंदवला आहे. त्यामुळे ही गोष्ट थोडी भीतीदायक खरंच चाललेली आहे. दरवर्षी गारपीट आणि अतिवृष्टी ही वाढत चाललेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आता सावध व्हावे. हवामान खात्याने अंदाज दिल्यानंतर आपले पिकांचे हार्वेस्टिंग लवकरात लवकर करून घ्यावी.