PM किसान योजनेचा 16वा हप्ता या दिवशी मिळणार? तारीख पहा, PM Kisan 16th installment

PM Kisan Yojana 16th installment नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार आहोत आहे याबद्दल थोडीशी चर्चा करणार आहोत. त्या आधी मी तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता कधी पडणार आहे याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे. मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता हा फेब्रुवारी अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. यासाठी सरकारने तब्बल 3792 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे. नमो शेतकरी योजनेकरिता 90 लाख शेतकरी पात्र आहे आणि या सर्व शेतकऱ्यांना फेब्रुवारी महिन्याच्या शेवटपर्यंत नमो शेतकरी योजनेअंतर्गत 4000 हजार रुपये मिळणार आहे आणि त्याबरोबरच पीएम किसान योजनेचे 2 हजार रुपये तर एकूण असे शेतकऱ्यांना 6000 हजार रुपये या महिन्यात मिळणार आहेत. तर आपण जाणून घेऊया पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता कधी मिळेल.

PM Kisan Yojana
PM Kisan Yojana

PM किसान योजनेचा 16वा हप्ता या दिवशी मिळणार?

शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे पी एम किसान योजना केंद्र सरकार तर्फे राबविण्यात येत आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना वार्षिक 6000 हजार रुपये रुपयांची मदत होते. ही मदत दर 4 महिन्याला 2000 हजार रुपये होत असते. आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होत असतात. पीएम किसान योजनेच्या 16व्या हप्त्यासाठी जवळपास 87 लाख 96 हजार शेतकरी पात्र आहेत. पी एम किसान योजनेचा 16वा हप्त्याचे पैसे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्र जिल्ह्यातील यवतमाळ येथून वितरित करण्यात येणार आहे.

PM किसान योजनेचा 16वा हप्ता या दिवशी मिळणार?
PM किसान योजनेचा 16वा हप्ता या दिवशी मिळणार?

शेतकरी मित्रांना बुधवारी म्हणजे 28 फेब्रुवारी 2024 रोजी पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 11 वाजून 30 मिनिटाला जमा होणार आहे. पी एम किसान योजनेसाठी जवळजवळ केंद्र शासनाकडून 1943.46 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो चिंतेचा काय विषय नाही तुमच्या बँक खात्यामध्ये 28 फेब्रुवारी 2024 रोजी पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता जमा करण्यात येणार आहे.

PM किसान योजनेचा 16वा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही?

पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता हा कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही याबद्दल थोडीशी चर्चा करूया. शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आधार कार्ड सोबत आणि मोबाईल नंबर सोबत लिंक केली नाही अशा शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता मिळणार नाही. त्याबरोबरच ज्या शेतकऱ्यांनी बँक ला आधार लिंक केले नसेल त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा मिळणार नाही. पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता हा डीबीटी द्वारे ट्रान्सफर करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांनी सीएससी केंद्रात जाऊन आपले आधार बँक सोबत जोडून घ्यावे.