नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता कधी येणार? नमो शेतकरी योजना 2 रा हप्ता या तारखेला फिक्स मिळणार? Namo Shetkari Yojana 2nd Installment

Namo Shetkari Yojana 2nd Installment नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार? हे प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये सारखे येत आहे. तर याबद्दल आम्ही सविस्तर माहिती या लेखामध्ये दिली आहे. ती तुम्ही सविस्तर संपूर्ण वाचावी. शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेअंतर्गत जवळपास 1792 कोटी एवढा निधी राज्य शासनाद्वारे मंजूर झालेला आहे. नमो शेतकरी योजना ही PM किसान योजना सारखीच आहे. जी एका वर्षामध्ये 6000 हजार रुपये शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून वाटप करते. या योजनेपासून शेतकऱ्यांना शासनाकडून थोडा तरी फायदा व्हावा हेच या योजनेचे उद्दिष्ट आहे. तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार आहे? आणि कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार नाही? याबद्दल आम्ही संपूर्ण माहिती दिली आहे तर चला पाहूया

नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता कधी येणार?

नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता कधी येणार?
नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता कधी येणार?

शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत दुसऱ्या हप्त्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाकडून जवळपास 1792 कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. याआधी नमो शेतकरी योजनेच्या पहिल्या हप्ता करिता 1720 कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आलेला होता. तेव्हा त्या योजनेमध्ये जवळपास 86 लाख शेतकरी पात्र होते. परंतु आता नमो शेतकरी योजनेतील दुसऱ्या हप्त्यांमध्ये जवळपास 90 लाख शेतकरी पात्र आहेत आणि त्यांच्या बँक खात्यावरती 1792 कोटी एवढे पैसे फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत शेवटपर्यंत वितरित करण्यात येतील. असे स्वतः राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट ट्विटर वरती सांगितले आहे. त्यामुळे चिंता करण्याचा काही विषय नाही नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती फेब्रुवारी महिन्याच्या शेवटपर्यंत किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये जमा होऊन जाईल.

फेब्रुवारी अखेरपर्यंत शेतकऱ्यांना मिळणार 6000 रुपये?

शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की PM किसान योजनेअंतर्गत एक जीआर काढण्यात आलेला होता त्यावर माहिती दिली होती ही PM किसान योजनेचा सोळावा हप्ता 28 फेब्रुवारी 2024 11 वाजून 30 मिनिटाला शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्यातून वितरित करण्यात येणार आहे. त्याबरोबरच PM किसान योजना नंतर नमो शेतकरी योजनेचा 2रा हप्ता सुद्धा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी अखरपर्यंतच जमा करण्यात येणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेचा 3रा हप्त्यासाठी जवळपास 2000 हजार कोटी एवढा निधी मंजूर केलेला आहे आणि नमो शेतकरी योजनेचा तिसरा हप्ता सुद्धा फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या हप्त्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाईल अशी अपेक्षा आहे.

1 thought on “नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता कधी येणार? नमो शेतकरी योजना 2 रा हप्ता या तारखेला फिक्स मिळणार? Namo Shetkari Yojana 2nd Installment”

Leave a comment