Today’s cotton Rate नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण महाराष्ट्र मध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त कापसाला भाव लागलेला आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कमी कापसाला भाव भेटला आहे याबद्दल थोडीशी जानकारी देणार आहोत. मित्रांनो जसे की तुम्हाला असं माहितीच आहे देऊळगाव राजा आणि परभणी येथे सर्वाधिक जास्त कापसाला भाव भेटत आहे आणि अजून बरेच काही असे जिल्हे आहेत जिथे सुद्धा कापसाला सर्वोत्तम भाव भेटत आहे. आज आपण या सर्व जिल्ह्याबद्दल माहिती घेणार आहोत. मित्रांनो जर तुम्ही कालचे दर पाहिले नसेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून कालचे कापूस भाव पाहून घ्या. जेणेकरून तुम्हाला थोडासा अंदाज येईल. त्याआधी खाली दिलेले कापसाचे दर अगोदर वाचा.
आजचे कापसाचे भाव संपूर्ण महाराष्ट्र
मित्रांनो कापसाच्या भावाबद्दल बोलायचं म्हटलं तर सध्या कापसाचा भाव हा वाढलेला आहे. फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत कापसाचे भाव अजून सुद्धा वाढण्याचे चान्सेस आहेत आणि पुढच्या महिन्यात मार्च किंवा एप्रिलमध्ये तर कापसाला चांगलाच दर भेटू शकतो, असे आम्हाला वाटत आहे. सध्या कापसाचे भाव बऱ्याच जिल्ह्यामध्ये 7000 आणि 7,500 हजार रुपये दर ओलांडला आहे. त्यामुळे शेतकऱ्याची नाराजगी थोडी दूर झालेली आहे. देऊळगाव राजा येथे चांगला कापूस भाव भेटत आहे. देऊळगाव राजा येथे प्रतिक्विंटल जास्तीत जास्त 7600 सहाशे रुपये एवढा झालेला आहे आणि त्यानंतर अकोला बोरगावमंजू येथे 7491 एवढा जास्तीत जास्त दर भेटत आहे. खाली दिलेल्या टेबल मध्ये सर्व जिल्ह मेन्शन केले आहेत आणि त्यांची जास्तीत जास्त दर सुद्धा.
बाजार समिती | जास्तीत जास्त दर |
पारशिवनी | 6950 |
अकोला | 7200 |
अकोला (बोरगावमंजू) | 7491 |
उमरखेड | 7170 |
देऊळगाव राजा | 7600 |
वारोरा माडेली | 7150 |
नेर परसोपत | 5800 |
हिंगणघाट | 7370 |
यावल | 6640 |
भद्रावती | 7000 |
कापसाचे भाव वाढणार आहेत का?
शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहितच आहे यंदाच्या खरीप हंगामा मध्ये पडलेल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कापसाचे पीक आणि सोयाबीनचे पीक हे जागेवरच वाया गेलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा झालेली आहे. 21 दिवसांपेक्षा जास्त पडलेल्या पावसाच्या कालखंडामुळे कापूस सोयाबीन आणि बरेच काही पिके जागेवर जळून खाक झाली. त्यामुळे शेतकरी येथे मोठा संकटात सापडला आणि त्यातली त्यात जिथे एका एकर मध्ये 10 ते 12 क्विंटल कापूर होणार होता तिथे फक्त 4 कुंटल कापूस झाला. त्यामुळे शेतकरी वैतागून गेले आणि कवडी दर कापसाला भाव भेटायला लागला यामुळे शेतकरी तर पागल झाले आहे. पण सध्या परिस्थिती बदलली आहे फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत कापसाचे भाव हे चांगले होतील. सध्या कापसाचे भाव आणि 7 हजार रुपयांचा आकडा ओलांडला आहे. भविष्यामध्ये होऊ शकतो की हा आकडा 8000 पर्यंत जाऊ शकतो त्यामुळे असं वाटतं की कापसाचे भाव वाढतील.
हे पण वाचा
2 thoughts on “आजचे कापसाचे भाव, कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक कापसाला दर लागला पहा लवकर? संपूर्ण महाराष्ट्र Today’s cotton Rate”