Kharif Crop Insurance 2023 नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण खरीप पिक विमा 2023 याबद्दल चर्चा करणार आहोत. महाराष्ट्र सरकारची सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे महाराष्ट्र पीक विमा योजना जी शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्ती पासून जसे की अतिवृष्टी ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, रोगराई, गारपीट, वादळ अशा गोष्टीमुळे जे नुकसान होते हे नुकसान महाराष्ट्र सरकार पिक विम्यात भरपाई करून देतो. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट एकच आहे की शेतकऱ्यांनी शेती करणे सोडून देऊ नयेत आणि त्यांना आर्थिक मदत मिळावी. ज्या शेतकऱ्यांनी 2023 2024 वर्षी एक रुपयाचा विमा काढलेला होता अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. नवीन जीआर नुसार जवळजवळ 35 लाख शेतकऱ्यांसाठी 75 टक्के विमा रक्कम देण्यात येणार आहे.
राज्य शासनाने जिल्हा निहाय यादी प्रसिद्ध केली आहे ज्यामध्ये जवळपास 16 जिल्हे आहेत आणि या जिल्ह्यामधील जवळपास 35 लाख शेतकऱ्यांना 1700.73 कोटी एवढी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे. या यादीमध्ये सर्वात जास्त बीड जिल्ह्यातील शेतकरी आहेत ज्यांची संख्या जवळपास 7.5 लाखापेक्षा जास्त आहे. 75% खरीप पिक विमा 2023 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 26 फेब्रुवारीपासून 16 जिल्ह्यांच्या वाटपास सुरुवात होणार आहे आणि शेतकऱ्यांना हेक्टरी 27 हजार रुपये मिळणार आहेत.
जिल्हा | शेतकरी लाभार्थी | रक्कम |
नाशिक | 3,50,000 | 155.74 |
जळगाव | 16,921 | 4.88 |
अहमदनगर | 2,31,831 | 160.28 |
सोलापूर | 1,82,534 | 111.41 |
सातारा | 40,406 | 6.74 |
सांगली | 98,372 | 22.04 |
बीड | 7,70.574 | 241.21 |
बुलढाणा | 36,358 | 18.39 |
धाराशिव | 4,98,720 | 218.85 |
अकोला | 1,77,253 | 97,29 |
कोल्हापूर | 228 | 1.30 |
जालना | 3,70625 | 160.48 |
परभणी | 4,41,970 | 206.11 |
नागपूर | 63,422 | 52.21 |
लातूर | 2,19,535 | 244.87 |
अमरावती | 10,265 | 8.00 |
हे पण वाचा
4 thoughts on “खरीप पिक विमा 2023 मंजूर, जिल्ह्यानुसार यादी पहा, 16 जिल्हे पात्र, 1700 कोटीचा निधी मंजूर Kharif Crop Insurance 2023”