Soybean Bhav: शेतकऱ्यांवर दुष्काळाचे प्रमाण आहे दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे आणि त्यातली त्यात सोयाबीन ला व्यवस्थित भाव सुद्धा भेटत नाहीये. दिवाळीमध्ये सोयाबीनचा भाव साधारणतः 5000 पेक्षा जास्त झाला होता परंतु सध्या सोयाबीनचा भाव 4500 पेक्षा जास्त होत नाहीये. त्यामुळे शेतकरी वैतागून गेले आहेत. परंतु सध्या कापसाचे भाव ढगात पोहोचली आहेत, कापूस भाव पुढील एक दोन महिन्यामध्ये 8000 पेक्षा जास्त जातील अशी अपेक्षा आहे. सध्या कापसाला भाव 7000 पेक्षा जास्त भेटत आहे. त्यामुळे शेतकरी खुश नजर येत आहेत. कापसाप्रमाणेच सोयाबीनला सुद्धा भाव भेटावा अशी शेतकऱ्यांचे म्हणणे आहे परंतु केंद्र सरकार ऐकायला तयार नाही. तर चला जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यामध्ये सोयाबीनला सर्वात जास्त भाव लागलेला आहे.
आजचा सोयाबीन बाजार भाव?
शेतकरी मित्रांनो दिवाळीमध्ये सोयाबीनला 5000 पेक्षा जास्त भाव भेटत होता परंतु शेतकऱ्यांना वाटले की मागील दोन वर्ष प्रमाणेच याही वर्षी सोयाबीनला 8000 पेक्षा जास्त भाव भेटेल. परंतु झालं उलट कवडी दर भेटत असल्याने शेतकरी सध्या वैतागून गेलेला आहे. शेतकऱ्यांनी यावर्षी म्हणजे खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात नुकसान झेलल आहे. पडलेल्या दुष्काळामुळे आणि 21 दिवसाच्या पाऊस कालखंडामुळे शेतकऱ्यांची सोयाबीनचा पीक जागेवरच करपलं आणि त्यातली त्यात सोयाबीनला व्यवस्थित पाणी न भेटल्यामुळे शेंगा कमी लागल्या आणि शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. जिथे एका एकर मध्ये 10 कुंटल सोयाबीन होणार होती की ती फक्त 5 ते 6 क्विंटल शेतकऱ्यांना झाली. त्यामुळे शेतकरी जागेवरच जिरले.
शेतकऱ्याला एकच असायला लागली होती की जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये सोयाबीनचे भाव वाढतील परंतु सोयाबीनचे भाव हे दिवसेंदिवस कमी होत चाललेले आहेत सध्या सोयाबीनला भाव साडेचार हजार पेक्षा कमीच भेटत आहे तर चला जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यात किती भाव भेटला आहे
आजचे सोयाबीन जिल्हानिहाय बाजारभाव
मित्रांनो जर आजचे जिल्हा निहाय बाजारभाव बद्दल बोललं जावं तर सध्या राज्यामध्ये 4000 पेक्षा जास्तच भाव भेटत आहे परंतु हा भाव खूपच कमी आहे त्यामुळे शेतकरी सोयाबीनचे पीक घरीच साठवून ठेवत आहेत तर कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये सोयाबीनला साडेचार हजार पेक्षा जास्त भाव भेटत आहे अशा दिल्याबद्दल आज आपण बोलणार आहोत.
बाजार समिती | जास्तीत जास्त दर |
परळी वैजनाथ | 4522 |
जळकोट | 4521 |
उमरखेड | 4560 |
औसा | 4675 |
निलंगा | 4510 |
चाकूर | 4516 |
औसद शहाजानी | 4511 |
उमरखेड | 4650 |
परळी वैजनाथ येथे 4522 रुपये जळकोट येथे 4521 उमरखेड 4560 औसा 4675 निलंगा 4510 चाकूर 4516 औसद शहाजानी 4511 उमरखेड 4650