दुष्काळग्रस्त सांगोला तालुक्यासाठी 157 कोटीचा निधी मंजूर, पहा तुमचे नाव आहे का, Sangola Drought Compensation

Sangola Drought Compensation नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचा अजून एक नवीन लेखामध्ये. शेतकरी मित्रांनो दुष्काळग्रस्त सांगोल्यासाठी अखेर 157 कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेले आहे. ही बातमी आमदार शहाजी पाटील यांनी दिलेली आहे. सांगोल्यातील खरीप दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. 2023 च्या खरीप दुष्काळामध्ये जवळपास 1 लाख 19 हजार 342 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या नुकसानापोटी शासनाने जवळपास 157 कोटी 7 लाख 67 हजार रुपयांचा निधीसाठी मंजुरी दिली आहे. त्याच्यामध्ये एकूण 40 तालुके खरीप हंगामामध्ये दुष्काळग्रस्त यादीमध्ये जाहीर केले होते. यामध्ये एक नाव म्हणजे सांगोला तालुक्याचे आहे. सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांनी खूप मोठे नुकसान यावर्षी सहन केले आहे.

सांगोला दुष्काळ भरपाई

सांगोला दुष्काळ भरपाई
सांगोला दुष्काळ भरपाई

शेतकरी मित्रांनो यंदा खरीप हंगामामध्ये सांगोला तालुक्यात काहीच पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचबरोबर ऑगस्टमध्ये पडलेल्या 21 दिवसाच्या पाऊस कालखंड मुळे शेतकऱ्यांचे जेवढे काही पीक आले होते ते जागेवरच जळाले आणि त्यानंतर शेतकऱ्यांचे 50% पिकापेक्षा जास्त नुकसान झालं. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातामध्ये काहीच नाही आलं. त्यामुळे दिवाळीमध्ये जवळपास 40 तालुके हे दुष्काळग्रस्त जाहीर करण्यामध्ये आहे आणि त्यामध्ये सांगोला तालुक्याचे नाव सुद्धा घेण्यामध्ये आले. अशा प्रकारे सांगोला तालुक्यातील जवळपास 1 लाख 19 हजार 342 शेतकरी या दुष्काळ भरपाईसाठी पात्र आहेत आणि या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जवळपास 157 कोटी 7 लाख 67 हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार आहे. निधी 4 मार्च 2024 पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आह.

यादी पहा

दुष्काळग्रस्त सांगोला तालुक्यात खरीप हंगामामध्ये हजारो हेक्टर शेती पिकांचं नुकसान झाले होते त्यामध्ये बागायत, जिरायती शेती, बहुवार्षिक पिके इत्यादी पिकांचा समावेश होता. अशा या सर्व शेतकऱ्यांना आता दुष्काळ भरपाई राज्य शासनातर्फे मिळणार आहे.

मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसासह गारपीटीचा इशारा, Weather Update

प्रधानमंत्री वय वंदना योजना, वयोवृद्धांना(म्हाताऱ्या) मिळणार पेन्शन,PM Vaya Vandana Yojana

सूक्ष्म सिंचन आणि वैयक्तिक शेततळे करिता 160 कोटीचा निधी मंजूर, पहा किती अनुदान मिळेल, Drip Irrigation Subsidy

1 thought on “दुष्काळग्रस्त सांगोला तालुक्यासाठी 157 कोटीचा निधी मंजूर, पहा तुमचे नाव आहे का, Sangola Drought Compensation”

Leave a comment